बारामतीत तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार..! आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल


इंस्टाग्राम वर ओळख वाढवून, आहे जवळीक साधून केला बलात्कार  

बारामती : या ठिकाणी एका ढोर समाजाच्या मुलीवर राजकीय पक्षाच्या 23 वर्ष युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी पीडित मुलीची आई यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. दि.22 रोजी  यानुसार आरोपी विरुद्ध गु.र.नं ३८३/२०२५ BNS ६९,६४(२) (एम),६५(१), अ जा ज अप्र का क ३(१)(r),3(१) (w) पोस्को ४,६,८,१२ या नुसार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.२५ एप्रिल २०२५ ते १७ ऑक्टों २०२५ या कालावधीत पीडित मुलीशी सोशल मीडियावरील इंस्टाग्राम वरून ओळख करून तिला चॉकलेट, वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट भेट वस्तू देऊन तिच्याशी ओळख वाढवून ,बारामती येथील फिर्यादींच्या राहत्या घराशेजारील शेड जवळ आरोपीने (रा. एमआयडीसी बारामती या ठिकाणचा रहिवाशी आहे.) बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे , पीडित मुलगी ही 13 वर्षाची अल्पवयीन ढोर समाजाची आहे हे आरोपीला माहीत असताना देखील, पीडित मुलीला लग्नाच अमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध करून तिच्यावर बलात्कार केला.

पुढील तपास आमदार म. पो. हवालदार खेडकर करत आहेत,या प्रकरणाचा संपूर्ण तपास मा. उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वात होत आहे.

या घटनेमुळे समाजात संतापाची लाट असून समाजातील विविध स्तरावरून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


11
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!