अमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा निर्धार; काऱ्हाटीत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात..!


कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था,काऱ्हाटी व सुपा पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी व तस्करी विरोधी दिन उत्साहात साजरा.

संपादक – अनिकेत कांबळे 

बारामती, दि. २७ जून : कृषि उद्योग मूल शिक्षण संस्था,काऱ्हाटी व सुपा पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने *जागतिक अमली पदार्थ सेवन विरोधी व तस्करी विरोधी दिन* विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी संकुलातील प्राथमिक शाळा, वसतिगृह विद्यालय, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहभागातून *सर्व्हिस रस्ता ते मुख्य कार्यालय* या मार्गावर व्यसनमुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर आधारित आशयघन पोस्टर्स हातात घेऊन विविध घोषणांद्वारे नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश दिला.

रॅलीनंतर आयोजित कार्यक्रमात विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे सामाजिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम याविषयी प्रभावी मनोगते व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट पोस्टर सादर करणाऱ्या व प्रभावी मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *श्री. मनोजजी नवसारे* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी, संकुलातील विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल मदने यांनी केले तर छायाचित्रण श्री. स्वप्नील धुमाळ व श्री. प्रतीक कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री. नवनाथ शिरसाट व सर्व विभागांचे समन्वयक यांनी केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्वांनी “मी अमली पदार्थांचे सेवन करणार नाही आणि इतरांनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करीन,”* अशी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली.अशी माहिती संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री. विकास निर्मळ यांनी दिली.


13
कृपया वोट करा

नव महाराष्ट्र न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!